सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
सी.पी.अॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना, विभाग तसेच कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. विष्णू ठाकरे योग प्रशिक्षक यांनी विद्यार्थी व खेळाडंूना विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवून दिले.
महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डाॅ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. जे. के. महाजन, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डाॅ. अरविंद सोवनी, डाॅ. आरती बाराहाते, दिनेश £ुरगे, विनोद डोंगरवार व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डाॅ. निशांत तिपटे यांनी या योग दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाला मोठया संख्येत विद्यार्थी, खेळाडू व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.