सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत तुळषीबाग महाल स्थित सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या वतीने रेषीमबाग मैदानावर आंतरवर्ग कबडडी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या क्रिडा विभागाचे संचालक डाॅ. शरद सूर्यवंषी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण समारंभ पार पडला.
डाॅ. शरद सूर्यवंषी म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील अनेक उत्साहवर्धक आणि खडतर प्रसंगातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. हिटलरसारख्या व्यक्तीला सुुद्धा ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित केले होते. परंतु ध्यानचंद आपल्या देषाला विसरले नाहीत. हिटलरलाही नकार देण्याचे धैर्य त्यांना खेळामुळे आले होते. आपल्या मातृभूमीवर त्यांचे खरे प्रेम होते. ही निव्र्याज प्रेमाची भावना प्रत्येक खेळाडूने जपली पाहिजे.
सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाला क्रिडा क्षेत्रात उज्ज्वल परंपरा असून आपल्या जडणघडणीत या महाविद्यालयाचे योगदान महत्वाचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आजचा काळ हा प्रचंड स्पर्धेचा असून आयुष्याच्या टप्यावरील कोणतीही स्पर्धा ही सकारात्मकच असली पाहिजे. त्यानेच जीवनाचा खरा आनंद मिळतो असेही ते यावेळी म्हणाले. प्रथम पारितोषिक 12 वी वाणिज्यच्या विद्याथ्र्यांनी मिळविले. तर बी. ए. भाग 1 च्या विद्याथ्र्यांनी उपविजेतेपद पटकावले. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मिलिंद बारहाते होते.व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. जे. के. महाजनउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा विभागप्रमुख डाॅ. निषांत तिपटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. विनोद डोंगरवार यांनी तर आभार प्रदर्षन प्रा. संजय पुसदकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येत उपस्थित होते.