Activity 4 – Marathi Department

स्व. जगन्नाथराव नाईकवाडे स्मृती
विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

सी. पी. and बेरार महाविद्यालय

आणि

स्वा. सावरकर स्मारक समिती

आयोजित

स्व. जगन्नाथराव नाईकवाडे स्मृती

विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

सी. पी. and बेरार महाविद्यालय आणि स्वा. सावरकर स्मारक समिती आयोजित विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ ला आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून रा. तु. म. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिधार्थविनायक काणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मेजर जनरल अच्युत शंकर देव होते.

या स्पर्धेला विदर्भातील १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचा हा विक्रमी सहभाग होता. या स्पर्धेत ५००१ रुपयांचा प्रथम पुरस्कार कु. चेतना भोसले, द्वितीय पुरस्कार निनाद दिक्षित, तृतीय पुरस्कार विवेक ओझा तर उत्तेजनार्थ पुरस्कार जितेंद्र आसोले आणि ऋषभ गुप्ता याना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी श्री विष्णू चांगदे होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते होते. सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत लाखे, संयोजक डॉ. अजय कुळकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Image Gallery

Video Gallery