Activity 5 – Marathi Department

सी. पी. & बेरार महाविद्यालयाच्या सूत्रसंचालन कार्य शाळा संपन्न

सी. पी. & बेरार महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित सूत्रसंचालन कार्यशाळेत महाराष्ट्रातून ३२७ प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कणकवली ते नांदेड आणि पुणे ते गोंदिया अशा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधींनी ही कार्यशाळा केली.  कार्यशाळेत ज्येष्ठ सूत्रसंचालक श्री प्रकाश एदलाबादकर, आकाशवाणीच्या ज्येष्ट उद्घोषक, निवेदिका श्रद्धा भारद्वाज, विख्यात वक्ते श्री दयाशंकर तिवारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते हे होते.

“सूत्रसंचालन : स्वरूप आणि तयारी” या विषयावर बोलताना प्रकाश एदलाबादकर म्हणाले की, सूत्रसंचालकाने सूत्रसंचालन करताना तारतम्य बाळगत कार्यक्रमाला आपल्या बुद्धिचातुर्याने पुढे नेणे गरजेचे आहे तसेच हारातील दोऱ्याप्रमाणे त्याचे कार्य असते. हारातील हा दोरा न दिसताही कार्यक्रमत सुसूत्रता आणीत असतो. हेच खरे सुत्रासंचालाकाचे काम आहे. तयारीसह संपूर्ण कार्यक्रमावर त्याचे नियंत्रण असण्यावरच कार्यक्रमाची यशस्विता अवलंबून असते. श्रद्धा भारद्वाज यांनी “आकाशावाणी आणि दूरदर्शनवरील निवेदन आणि मुलाखती या विषयानुशगाने मार्गदर्शन केले. निवेदकाला माईकचे भान तर असावेच सोबतच आपल्या आवाजावर त्याने लक्ष करण्याची गरज आहे. सोबतच निवेदन असो की मुलाखत अभ्यापूर्ण प्रश्न आणि अभिप्राय देता आले पाहिजे. त्यासाठी विशेष तयारी करावी लागते. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ हेच निवेदकाच्या यशाचे गमक आहे. असेही त्या म्हणाल्या. श्री दयाशंकर तिवारींनी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेपासून वक्त्याच्या गुणाची नी कार्याची माहिती असली पाहिजे. त्यामुळे प्रभावी सूत्रसंचालन करता येते. सूत्रसंचालन करतानाचे आपले अनुभव यावेळी त्यांनी  सांगितले. कार्यक्रमाचे होस्ट म्हणून कार्य आणि प्रास्ताविक डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. माधुरी दाताळकर विषद केली. आभार श्री अनिल देव यांनी मानले.

Image Gallery

Video Gallery