Activity 6 – Marathi Department

सी पी अँड बेरार महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन

सी. पी अॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या मराठी विभागाने लॉक डाऊनच्या काळात  तहान : ग्रामीण वास्तव आणि
अध्यापन प्रक्रिया ' या विषयावर दि .१७ मेला सकाळी १० वा वेबिनारचे यशस्वी आयोजन केले गेले. या वेबिनारला
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेबनारला तहान कादंबरीचे लेखक डॉ. सदानंद
देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सदानंद देशमुख हे ज्ञानपीठ पुरस्कार योग्यतेचे लेखक असून त्यांची तहान ही कादंबरी वास्तव आणि
निर्मिती अंगाने सरस आहे. देशमुखांनी विविध वाड.मय प्रकारातून जोमाने साहित्य निर्मिती करावी असे डॉ. वि.
स. जोग यांनी अध्यक्ष म्हणून मत व्यक्त केले.विदर्भात प्रथमच वाड.मयीन वेबिनारचे आयोजन सी. पी. अँड
बेरार महाविद्यालयाने केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. वेबिनार ही घरबसल्या अभ्यासक आणि
संशोधक मंडळींना पर्वणी ठरली . या वेबिनारचे प्रास्ताविक संयोजक डॉ अजय कुळकर्णी यांनी केले .
वेबिनार आयोजनाची भूमिका डॉ अलका इंदापवार यांनी विशद केली. . प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांनी
मनोगतातून मराठी विभागाचे अभिनंदन करून या वेबिनारची आवश्यकता विशद केली. बीजभाषणात डॉ
मदन कुलकर्णी यांनी तहान या कादंबरीची मौलिकता सिद्ध करताना ही कादंबरी ग्रामीण विश्वाला दिशा
दर्शक असून वैश्विक नाते निर्माण करणारी असल्याचे सांगितले.
तहान कादंबरीचे लेखक डॉ सदानंद देशमुख हे कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेबाबत बोलताना म्हणाले की,
कादंबरी वास्तव असून त्यांच्या बालपणी पाण्याचे जे दुर्मिक्ष्य होते त्याचे चित्रण त्यांच्यातील लेखकाला
अस्वस्थ करणारे होते म्हणून अवघ्या १९ दिवसात ही कादंबरी त्यांनी लिहिली. कादंबरीतील सर्वच प्रसंग
त्यांच्या रोजमर्राच्या जीवनातील आहे. या कादंबरीचा उद्देश जलसाक्षरता असल्याचे त्यांनी सांगितले.
तहान कादंबरीतील स्त्री पात्रे  या विषयावर डॉ रेखा जगनाळे यांनी तर तहान एक शिकार कथा  यावर
डॉ अरविंद कटरे यांनी विवेचन केले. तहान एक शोकांतिका : राघोजीची की बबनची  या विषयी डॉ
राखी राऊत यांनी आणि तहान ग्रामवास्तव आणि पर्यावरणावर यावर डॉ. जगदीश गुजरकर यांनी
अभ्यासपूर्ण भाष्य केले. वेबिनारमधे अनेक मराठी साहित्याचे अभ्यासक आणि प्राध्यापक सहभागी झाले
होते. आभार डॉ रेखा वडिखाये यांनी मानले.

Image Gallery

Video Gallery